Ad will apear here
Next
‘शिशिर रामेश्वरम नॅशनल टॅलेंट हंट’ शिष्यवृत्तीकरिता नोंदणी सुरू
संरक्षण दलात अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

मुंबई : भारतीय संरक्षण दलांच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या मुंबईतील सेंचुरियन डिफेन्स अकादमी या सेंचुरियन एज्युकेशन प्रा. लि. च्या संरक्षण विभागाने वर्ष २०२०साठी ‘शिशिर रामेश्वरम नॅशनल टॅलेंट हंट’ची (एसआरएनटीएच) नोंदणी सुरू केली आहे. संरक्षण दलातील अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक मार्गदर्शनासह त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा या शिष्यवृत्तीमागील मुख्य उद्देश आहे.

हा एक राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती कार्यक्रम असून, संरक्षण दलातील अधिकारी बनण्याची क्षमता असणाऱ्या देशभरातील उत्कृष्ट उमेदवारांचा शोध याद्वारे घेतला जातो. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१९ ही आहे. अर्जदारांच्या सोयीसाठी व सुविधेसाठी ही परीक्षा १५ राज्यात घेण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्येदेखील एक परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे.

या शिष्यवृत्तीकरिता महत्त्वाची पात्रता म्हणजे विद्यार्थी भारतीय नागरिक असला पाहिजे आणि कोणत्याही बोर्डातून दहावी, बारावी किंवा कोणत्याही विषयात पदवी अभ्यासक्रम करत असला पाहिजे. इच्छुक उमेदवार www.defenceguru.co.inकिंवा www.centuriondefenceacademy.com पैकी कोणत्याही संकेतस्थळावर १०० रुपये नोंदणी शुल्क भरून नोंदणी करू शकतात. नोंदणी झाल्यावर त्यांना याच वेबसाइटवरुन दोन आठवड्यांत प्रवेश कार्ड मिळेल.

शिष्यवृत्ती परीक्षेत हे सर्वोत्तम दहा विद्यार्थी अल्फा वर्गात येतील व त्यांना नोंदणी शुल्क, ट्यूशन फी आणि अभ्यास साहित्यात शंभर टक्के सवलत मिळेल. त्यानंतरचे २०  विद्यार्थी ब्राव्हो वर्गात येतील व त्यांना ट्यूशन फीमध्ये ९० टक्के तर, अभ्यास साहित्यात शंभर टक्के सवलत मिळेल.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZRZCH
Similar Posts
‘टाटा प्रोजेक्ट्स’ला आयआयटी संस्थांमध्ये उदंड प्रतिसाद मुंबई : टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व सर्वांत प्रशंसाप्राप्त संरचना कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने या वर्षी दिल्ली, मुंबई, मद्रास, कानपूर आणि खरगपूर या भारतातील आघाडीच्या पाच आयआयटी संस्थांमधून ५० इंजिनीअर्सची नियुक्ती केली आहे.
अस्खलित इंग्रजी बोलण्यासाठी विनामूल्य ‘इंग्लिश ९९’अॅप मुंबई : अस्खलित इंग्रजी बोलण्यासाठी प्रशिक्षण देणारे एक अनोखे अॅप आता उपलब्ध झाले आहे. ‘इंग्लिश ९९’ असे या अॅपचे नाव असून, ते विनामूल्य उपलब्ध आहे. आपल्या देशातील एक कोटी लोकांना २०२३ पर्यंत अस्खलित इंग्रजी शिकवण्याचे उद्दिष्ट मनाशी बाळगून पीयूष आणि माया भाटिया यांनी हे अॅप उपलब्ध केले आहे.
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
नवले महाविद्यालयात संविधान दिन साजरा कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language